ऋतुराज गायकवाड क्रिकेट विश्वातील अनोखी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने क्रिकेटच्या विश्वात नवीन इतिहास रचला आहे. ऋतुराजने २२० धावांचा इनिंगमध्ये सोळा षटकार मारले आहेत. ऋतुराजने फक्त एक गोलंदाज सोडून बाकी सर्वांच्या गोलंदाजीवर षटकार ठोकले. शिवा सिंह या गोलंदाजाविरोधात सर्वाधिक षटकार मारले आहेत. शिवा सिंहाच्या गोलंदाजीवर ऋतुराजने नऊ षटकार मारले आहेत. तर एकाच ओव्हरमध्ये सात षटकार मारून इतिहास घडवला आहे.

शिवा सिंहने २०१८ मध्ये पश्चिम बंगालविरुद्ध एका अंडर २३ च्या सामन्यात ३६० डिग्री फिरून गोलंदाजी केली होती; परंतु आताच्या सामन्यात अंपायरने त्यावर आक्षेप घेतला होता; परंतु हा सामना शिवा सिंह याचा बॉलिंग ॲक्शनमुळे नाही, तर ऋतुराच्या षटकारांमुळे चर्चेत आहे. शिवा सिंहविरोधात ऋतुराजने ३५ चेंडूंत ७६ धावा करीत चांगलीच धुलाई केली.

ऋतुराजने ७ षटकार नक्की कसे मारले ते पाहूयात- पहिल्या षटकारात ऋतुराजने शिवा सिंहचा यॉर्कर चेंडूला हाफवाली बनवलं. दुसऱ्या षटकारात गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल मारला. तिसऱ्या षटकारात मिड विकेटच्या डोक्यावरून ऋतुराजने षटकार मारला. चौथा षटकार लॉंग ऑफवरून मारला गेला. पाचवा षटकार देखील लॉंग ऑफवरूनच मारला गेला. सहावा व सातवा षटकार मिड विकेटच्या वरून गेला. एकाच ओव्हरमध्ये सात षटकार ठोकणारा ऋतुराज गायकवाड क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा