मुंबई, ८ सप्टेंबर २०२०: नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मंगळवारी सलग तिसर्या दिवशी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची चौकशी करेल. एनसीबीची चौकशी करण्यासाठी रिया चक्रवर्ती घराबाहेर पडली आहे. एनसीबी गेल्या दोन दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणात रियावर विचारपूस करत आहे. रियची आज शौविक आणि मिरांडासमोर चौकशी केली जाऊ शकते. आज रियालाही अटक केली जाऊ शकते. आतापर्यंत एनसीबीने तीच्याकडे दोन दिवसांत सुमारे १४ तास चौकशी केली आहे. रियाच्या चौकशीच्या माध्यमातून एनसीबी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या ड्रग्स वापर संबंधित सखोल तपासणी करू इच्छित आहे.
संशयास्पद परिस्थितीत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीचा एक भाग आता बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा वापर आणि खरेदीपर्यंत पोहोचला आहे. त्याचे संकेत रिया चक्रवर्ती हिच्या मोबाईलवरून २०१९-२० मध्ये केलेल्या काही चॅटवरून सापडले असल्याने या प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांची नावे आहेत. एनसीबीने शौविकसह आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.
सोमवारी रिया चक्रवर्ती यांनी सुशांतसिंग राजपूत याची बहीण प्रियंका आणि इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला. रियाने प्रियंका सिंगवर बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन बनविल्याचा आरोप केला आहे. रियाच्या या एफआयआरवर सुशांतची बहीण श्वेतासिंग कीर्ती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. श्वेताने ट्वीट करून लिहिले आहे की- कोणतीही गोष्ट आम्हाला कमजोर करू शकणार नाही त्यातल्या त्यात खोटा एफआयआर तर नाहीच.
सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केली
दुसरीकडे रिया चक्रवर्ती हिने सोमवारी वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांत सिंगची दिल्लीतील बहीण प्रियंका सिंह आणि दिल्ली येथील डॉक्टर, तरन कुमार यांच्यासह काही नामांकित लोकांविरूद्ध लेखी तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की सुशांत ८ जून २०२० रोजी सकाळी मोबाईल फोनवर सतत व्यस्त होता. रियाच्या म्हणण्यानुसार सुशांत म्हणाला की त्याची बहीण प्रियंकाने त्याला काही औषधे सुचविली आहेत. रियाच्या मते, काही तज्ञ डॉक्टरांकडून तिच्या बहिणीने हे औषध सुचवले आहेत आणि या आधी घेत असलेले औषध हे चुकीचे असू शकतात असे सुशांतच्या बहिणीने सांगितले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे