मुंबई, ६ सप्टेंबर २०२०: सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मादक पदार्थांचा तपास आणखीनच वाढत असल्याचे दिसत आहे. या व्यतिरिक्त या प्रकरणात बरीच धक्कादायक माहितीही समोर येत आहे. सॅम्युअल मिरांडा याने नारकोटिक्स ड्रग कंट्रोल ब्यूरोला सांगितले आहे की तो सुशांतसिंग राजपूतसाठी २०१९ ते २०२० पर्यंत ड्रग्सची व्यवस्था करत असत.
सॅम्युएलने सांगितले की, शौविकने त्याचा एक मित्र सूर्यदीपचा नंबर दिला होता, त्याने करमजित नावाच्या सप्लायरचा नंबर दिला होता, जो २५०० / – मध्ये एक पॅकेड उपलब्ध करून देत असे. सॅम्युएलने सांगितले की, करमजित वॅटर्स्टोन क्लब, प्राइम रोज अपार्टमेंट (रियाचे घर) आणि माउंट ब्लेक अपार्टमेंट (सुशांतचे घर) येथे वीड डिलीवर करीत असे.
मार्च २०२० मध्ये, शौविकने सुशांतसाठी बड आणण्यास सांगितले होते आणि झैदचा फोन नंबर दिला होता. यासह त्याने असे ही सांगितले होते की एचडीएफसी बँकेचे कार्ड अब्दुल बासितचा संदर्भ देत वापरावे. या कार्डमधून ५ ग्रॅम बडसाठी १० हजार रुपये काढले गेले. सॅम्युएल झैदजवळ गेला आणि ‘Eat around the corner’ येथे भेटून त्याला बड दिले.
यावरून हे स्पष्ट झाले आहे की सॅम्युअल ड्रग्स खरेदी करीत होता आणि या संदर्भात एनसीबीला इलेक्ट्रॉनिक पुरावेदेखील प्राप्त झाले आहेत, सॅम्युअल या ड्रग्स सिंडिकेटचा सक्रिय सदस्य होता ज्यात उच्च समाजातील व्यक्ति आणि ड्रग्स पुरवठादार गुंतले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे