रोटरी क्लब फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी रो.सारिका रोडे यांची निवड

5

पुणे, दि. २२ जुलै २०२०: रोटरी क्लब फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी रो. सारिका रोडे यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्ष रो.भक्ति शहा-सापके यांच्या कडून त्यांनी आज सूत्रे स्वीकारली. यावेळी सेक्रेटरी पदी असित शहा, उपाध्यक्षपदी निखिल टकले, तर खजिनदारपदी प्रवेश गुप्ता यांची निवड करण्यात आली. हा कार्यक्रम ऑनलाइनरित्या पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, माजी अध्यक्ष रो. दीपक तोष्णीवाल होते मान्यवरांच्या बरोबरच अन्य पदाधिकारी व रोटरी सदस्य (ऑनलाईन) उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष रो.सारिका रोडे म्हणाल्या, आगामी काळात पर्यावरण, रोजगार, महिला सबलीकरण, रोटरी क्लब मध्ये तरुण सदस्य वाढ इत्यादी क्षेत्रात कार्य करणार असल्याचे नमूद केले.

न्युज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा