पुणे, १३ जानेवारी २०२४ : नेहरू युवा केंद्र, पुणे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आयोजित कार्यक्रम पुणे महानगरपालिका, हरीभाई वी. देसाई कॉलेज आणि हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुन्दास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय यांनी शनिवार वाडा, पुणे येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह, रस्ता सुरक्षा अभियान आणि राजमाता जिजाबाई यांची जयंती तसेच माय भारत च्या टीशर्ट वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या सप्ताह मध्ये नेहरू युवा केंद्र- पुणे मनपा, पोलीस विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच वेगवेगळी महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान, पर्यावरण विषयक जनजागृती, सांस्कृतिक उपक्रम’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तसेच माय भारत पोर्टल विषयी माहिती नेहरू युवा केंद्राचे स्वप्नील शिंदे यांनी प्रस्ताविकात दिली.
‘स्वामी विवेकानंद हीच आजच्या भारतीय तरुणाईची दिशा आहे. आजच्या भारतीय तरुणांनी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या दिशेने वाटचाल केली तर, भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने प्रवास करू शकेल. विवेकानंदांच्या विचारानुसार, भारतीय तरुणांनी निराशा झटकून देशाच्या विकासात हातभार लावायला हवा’ असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनर यांनी केले.
यावेळी प्रथम स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर माय भारत टीशर्ट चे वितरण केले. हुजूरपागा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी रस्ता सुरक्षा या विषयावर पथनाट्य सादर केले. शनिवार वाडा ते दगडूशेठ मंदिर पर्यंत रॅली काढून प्रत्येक सिग्नलवर जे लोक ट्रॅफिकचे नियम पाळतात त्यांना गुलाब पुष्प दिले व दगडूशेठ गणपती येथे पथनाट्या सादर केले.
कार्यक्रमाला संदीप कदम उपायुक्त घन कचरा विभाग मनपा, अमोल पवार सहाहयक आयुक्त कसाब विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय, आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, केंद्रीय संचार ब्यूरो भारत सरकारचे पन्नी कुमार, पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत रघतवान, स्वच्छ पुणे सुंदर पुणे ब्रॅंड अँबेसिटर रूपाली मगर व इतर मान्यावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्रपाली चव्हाण यांनी केले. कार्यक्रम आयोजनासाठी व वी पुणेकर वर्शिप अर्थ फाउंडेशन आणि सोशल विकास फाउंडेशन यांनी सहकार्य केले.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर