बलात्कार करून गुप्तांगात घुसवला रॉड, दिल्लीतील निर्भया घटनेची मुंबईत पुनरावृत्ती

13
मुंबई, ११ सप्टेंबर २०२१: मुंबईला हादरवणारी घटना उपनगरातील साकीनाका परिसरात घडली आहे. एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. ही घटना ९ सप्टेंबरला रात्री ३ च्या दरम्यान घडली. दरम्यान पीडितेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं असून त्या विकृताला अटक करण्यात आली आहे.
पीडित महिलेची प्रकृती गंभीर
पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ती अद्यापही बेशुद्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या प्रकृतीसाठी डॉक्टर मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत.
नक्की काय घडलं?
पोलीस कंट्रोल रुमला ९ ऑगस्टच्या मध्यरात्री ३ वाजता फोन आला. त्या फोनवरुन एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार देण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. अधिकारी आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोहचल्यानंतर पोलिसांनी पीडिता जखमी अवस्थेत सापडली. त्यानुसार पोलिसांनी पीडितेला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयत दाखल केलं. पीडिता गंभीर जखमी असून प्रकृती चिंताजनक आहे. तसेच पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर सळीने मारल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मोहन चोहान या आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा