रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

6

मुंबई, १८ ऑक्टोबर २०२२ : बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इंडियाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी यांची वर्णी लागलेली आहे. तर उपाध्यक्षपदी राजू शुक्ला, व सचिवपदी जय शहा तर कोषाध्यक्षपदी भाजप नेते आशिष शेलारयांची बिनविरोध निवड झाली आहे.

आज मुंबईतील मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. आजच्या बैठकीला रॉजर बिन्नी, बीसीसीआयचे सचिव जय शहा, माझी अध्यक्ष सौरभ गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाल, यांच्या उपस्थित आजची बैठक पार पडली.

६७ वर्षीय रॉजर बिन्नी यांनी कर्नाटक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पद सांभाळलं आहे. आतापर्यंत ते कर्नाटक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते. ते १९८३ च्या विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते, या स्पर्धेत त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. त्यांनी आठ सामन्यात १८ विकेट्स पटकावल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा