अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची रोहित पवारांकडून पाहणी

कर्जत,दि. १२ मे २०२०: दि. १० रोजी सायंकाळी अचानकपणे झालेल्या वादळी पाऊसामुळे व काही प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे कांदा, मका, ऊस, लिंबू काही प्रमाणात द्राक्ष आदीं पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील राक्षसवाडी (बुद्रुक), धालवडी, तळवडी, सुपे आदी भागातील पिकांचेही नुकसान झाले आहे. आमदार रोहित पवारांनी सकाळीच मतदारसंघातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून या नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळवून देऊ असा शेतकऱ्यांना दिलासा दिला. रोहित पवारांच्या सुचनेनुसार महसूल विभागाकडून नुकसान झालेल्या फळबागांचे व पिकांचे सर्वेक्षण करून पंचनाम्यांचे अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना महसूल विभागाला दिल्या आहेत.

यावेळी कर्जतचे तहसीलदार छगन वाघ, कृषी अधिकारी दिपक सुपेकर, मंडलाधीकारी तसेच संबंधित विभागातील तलाठी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा