दुबई २६ फेब्रुवारी २०२५ : दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर भारतीय टीम पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सरावाला लागली आहे. यातच टीम इंडियसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. अ गटातून भारत आणि न्यूझीलंड संघ रविवारी स्पर्धेतील अंतिम सामना खेळणार आहे. दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. पण रविवारी होणाऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा मुकण्याची शक्यता आहे.
काल पासून भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सराव करताना दिसला नाही. TOI ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाने फुटबॉल खेळायला सुरुवात केली, पण त्यात सुद्धा तो सहभागी झाला नाही. त्यानंतर रोहित शर्मा पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरशी चर्चा करताना दिसला.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या मांडीचे दुखणे उद्भवले. त्यामुळे रोहित रविवारी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी उपकर्णधार शूबनम गिल टीम इंडिया संघाचा तुरा सांभाळेल. कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुरुवाती पासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने ३ चौकार आणि एक षटकारासह १५ चेंडूत २० धावा केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर