रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार ? दुखापतीबद्दल मिळाली ‘ही’ अपडेट

मुंबई, १६ डिसेंबर २०२२: भारताने लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आज कसोटीचा तिसरा दिवस आहे. दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच, तासाभरात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव १५० धावात गुंडाळला. या सोबतच कसोटीमध्ये २५४ धावांची आघाडी घेतली. हे सर्व प्रयत्न चौथ्या दिवशीच्या विजयाचे कारण ठरतील अशी शक्यता आहे. या सगळ्यामध्ये कर्णधार रोहित शर्माबद्दल मोठी बातमी समोर येत आहे.

रोहित शर्माला दुसऱ्या वनडे दरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. डॉक्टरांच्या उपचारादरम्यान रोहितचा अंगठा निखळल्याचे आढळून आले. त्यानंतरही संघ अडचणीत असल्याने रोहितने फलंदाजी केली परंतू तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. रोहित उपचारासाठी मुंबईत आला होता.आता मात्र रोहित पूर्णपणे बरा झाला असून दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्यास सज्ज असल्याचे बोलले जात आहे. वनडे मालिकेत अंगठ्याला दुखापत झाल्यानंतर तिसऱ्या वनडेसह पहिल्या कसोटीतून रोहितने माघार घेतली होती. परंतू रोहित शर्मा बांगलादेशला आज किंवा उद्या रवाना होणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे.

तसे बघायला गेले तर रोहितला २०२२ मध्ये अनेक वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहितचा नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कपही गमावला. तर ट्वेंटी २० वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर टीम इंडियाने बांगलादेश विरुद्धची वनडे मालिकाही गमावली. त्यामुळे पुनरागमन करून रोहितला संघासाठी उत्तम खेळ खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याआधी रोहित शर्माच्या कर्णधार पदावर आणि त्याचा फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत होते. अखेर बीसीसीआयने रोहितवर योग्य उपचार होत असून वैद्यकीय संघ त्याची पूर्ण काळजी घेत आहे. त्याचप्रमाणे आम्हाला आशा आहे की, तो दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करेल, असे म्हटले आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा