अंबालिका साखर कारखान्याचे चालू वर्षीच्या गळीत हंगामासाठी रोलर पूजन

कर्जत, दि. ११ जुलै २०२०: कर्जत तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी अतिशय महत्त्वाचा कारखाना म्हणून बारडगाव येथील अंबालिका साखर कारखाना कडे पाहीले जाते. या कारखान्याचे चालु वर्षाचे गळीत हंगामासाठी आज रोजी रोलर पूजन करण्यात आले.

अंबालिका साखर कारखान्याने या वर्षी गळीत हंगाम सुरू करण्यासाठी रोलरचे पूजन आज करण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व परिसरात सॅनिटायजर करून सामाजिक अंतर ठेवून मास्क लाऊन हा कार्यक्रम निवडक आणि मोजक्याच मान्यवरच्या उपस्थित पार पडला.

या वेळी कारखान्यांने १५ ते २० लाख मॅट्रीक टन ऊसाचे गाळप कारखान्याने करण्याचे ठरवलेले आहे. मागील वर्षी कारखान्याने एफआरसी सह २६०० रूपये भाव देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले होते. या वर्षी देखील कारखाना चांगला भाव ऊस उत्पादकांना देणार आहे. अशी माहिती कारखान्याचे संचालक जंगल वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश तावरे यांनी दिली.

या वेळी कारखान्यांचे मॅनेजर सुरेश तावरे तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि आस पास चे प्रमुख ऊस उत्पादक शेतकरी या वेळी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा