नवी दिल्ली, ११ जुलै २०२१: पेट्रोल आणि डिझेलनंतर एलपीजीच्या दरात सातत्याने वाढ केल्याने सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. मागील वर्षाच्या मेच्या तुलनेत आतापर्यंत दर सिलिंडरमध्ये २६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यातही अडचणीत अधिक वाढ झाली आहे कारण एकतर ग्राहकांना एलपीजी सबसिडी मिळत नाही किंवा ज्यांना मिळत आहे ती फक्त २०-३० रुपये मिळतेय. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, एलपीजी अनुदान कधी मिळणार, किती, याबाबत सरकारने अद्याप स्पष्टीकरण दिले नाही.
साधारणत: ६ सदस्यांच्या कुटुंबासाठी १४.२ किलो एलपीजी सिलिंडर एका महिन्यापेक्षा जास्त काळ टिकत नाही. एका वर्षा पूर्वी सुमारे ५९० रुपयांमध्ये मिळत असलेल्या सिलिंडरची किंमत आता सुमारे ८५० रुपये आहे. किंमती आणखी वाढल्या नाहीत तरी अशा कुटुंबाचा खर्च वार्षिक ३००० रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे, तोही केवळ एलपीजीवर. तर दुसरीकडं पेट्रोल आणि डिझेल महागाईने खिशावर आलेले ओझे. अशा प्रकारे घराचे बजेट पूर्णपणे हादरून गेले आहे. कमाई कमी आणि खर्च सातत्याने वाढत आहेत.
एलपीजी दरवाढीमुळं तर लोक त्रस्त झाले आहेत पण त्याहीपेक्षा त्रासदायक गोष्ट म्हणजे मागील एक वर्षापेक्षा जास्त काळ ग्राहक सबसिडीची प्रतीक्षा करत आहेत. आकडेवारी पाहिल्यास मार्च २०२० मध्ये घरगुती एलपीजीवर सुमारे २३१ रुपये प्रति सिलिंडर अनुदान होते. मे २०२० मध्ये किंमतीत कपात झाली आणि अनुदानित आणि विना अनुदानित सिलिंडरमधील अंतर जवळपास कमी केले. परंतु त्यानंतर जेव्हा किंमती वाढल्या, तेव्हा अनुदान किती मिळंल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील डोंगराळ भाग वगळता ग्राहकांना अनुदान मिळत नाही. ज्यांना मिळत आहे ते केवळ २०-३० रुपये. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुदान देय देण्याच्या संदर्भात अद्याप वित्त मंत्रालयाकडून सूचना मिळालेल्या नाहीत. अनुदानाबाबत अद्याप समस्या आहे. परंतु पेट्रोल-डिझेल आणि खाद्य तेलांच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर यामुळं सामान्य माणसांच्या खर्चात आणखीन भर पडलीय
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे