नवी दिल्ली, २२ सप्टेंबर २०२२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत, यांनी आज दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत अखिल भारतीय मुस्लिम इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलायसी, यांच्यासह अन्य मुस्लिम नेत्यांची भेट घेतली आहे. इमाम इलायसी आणि मोहन भागवत यांच्यात बंद खोलीत सुमारे एक तास बैठक झाली आहे.
मोहन भागवत यांच्या सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी कृष्ण गोपाल, रामलाल आणि इंद्रेश कुमारही उपस्थित होते. तर यापूर्वी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय खुरेशी आणि दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग यांच्यासह मुस्लिम विचारवंतांच्या पाच सदस्यीय गटाने मोहन भागवत यांच्या सोबत भेट घेतली होती. आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे सर्व स्तरातील लोकांना भेटतात तर एका महिन्यात मुस्लिम विचारवंतांसोबत भागवत यांची ही दुसरी बैठक झाली आहे. RSS अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
RSS सरसंघचालक हे सर्व स्तरातील लोकांना भेटतात हा चालू असलेला सामान्य संवाद प्रक्रियेचा भाग आहे. हिंदू मुस्लिम यावर आरएसएस ने अलीकडे मुस्लिमांशी संपर्क वाढवला आहे, तर मोहन भागवत यांनी मुस्लिम समाजातील नेत्यांच्या अनेक बैठका घेतले आहेत. तसेच २२ ऑगस्ट रोजी संघप्रमुख भागवत, यांनी मुस्लिम विचारवंतांच्या पाच सदस्य चमूची भेट घेतली आहे. या बैठकीत देशातील जातीस सखोल मजबूत करणे आणि हिंदू – मुस्लिम यांच्यातील वाढतं अंतर कमी करणे या विषयी भेट झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे