मुंबई, १४ डिसेंबर २०२२ : यशवंतराव चव्हाण वाड्मय पुरस्कारांमधील फ्रॅक्चर्ड फ्रीडम – तुरुंगातील आठवणी व चिंतन या कोबाड गांधी लिखित पुस्तकाला प्रौढ वाड्मय अनुवादित श्रेणीत पुरस्कार जाहिर झाला होता. मात्र या पुस्तकामध्ये नक्षलवादाचे समर्थन करण्यात आले आहे असा ठपका ठेवून तो पुरस्कार परत घेण्यात आला आहे. यासगळ्या परिस्थितीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
- साहित्यात वाढतोय राजकीय हस्तक्षेप
अजित पवार म्हणाले, साहित्यात राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. हे गंभीर आहे. ६ डिसेंबर २०२२ रोजी उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कार जाहीर केले. त्यातील अनुवादित कोबाड गांधी यांच्या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर ६ दिवसांत अशा काही घटना घडल्या की, १२ तारखेला पुरस्कार रद्द केला. सरकारने यात हस्तक्षेप करणे अयोग्य आहे.
- जाणीवूर्वक महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न
पुढे म्हणाले, जून महिन्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवरआले. त्या वेळेपासून सातत काही तरी नवीन वाद काढण्याचे काम सुरु आहे. जेणेकरुन जाणीवूर्वक महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलीस कारवाई करत असेल तर आम्ही त्यात हस्तक्षेप करत नाही. आम्हाला जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात. ते निर्णय घेत असतात. मात्र इथे समितीने पुरस्कार दिला होता आणि त्यात राजकिय हस्तक्षेप उघड उघड दिसत आहे. त्यामुळे आमची मागणी आहे, राज्यकर्त्यांनी ढवळाढवळ करू नये. राज्य सरकारचा हस्तक्षेप निषेधार्य आहे. विचारांची लढाई ही विचाराने करणे आवश्यक आहे, असेेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.