किम जोंग विषयी उठत आहेत अफवा

उत्तर कोरिया, दि. २६ एप्रिल २०२०: उत्तर कोरियाचा ३६ वर्षीय शासक किम जोंग उन बद्दल सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. इतकेच नाही तर काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी किमच्या प्रकृतीशी संबंधित बातम्याही प्रकाशित केल्या आहेत. या अहवालांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. परंतु सत्य काय आहे ते जाणून घेऊया

एक जपानी मीडिया आणि एक चिनी समर्थीत पत्रकार यांनी किमविषयी वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या आहेत. ११ एप्रिलपासून किम देशातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नाही. यानंतर त्याच्या तब्येतीबद्दल अनेक प्रकारच्या अटकळांना सुरुवात झाली. किम जोंग उन आजोबांच्या जयंतीनिमित्त १५ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात देखील सहभागी झाले नाहीत. उत्तर कोरियाचे जनक किम इल संग यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि देशात सुट्टी सुद्धा असते.

उत्तर कोरियाच्या सरकारने किमबाबत कोणतेही विधान केलेले नाही. पण दक्षिण कोरियाच्या सरकारने किमच्या तब्येतीबद्दलच्या वृत्तास फेटाळून लावले. किम जोंग उनशी संबंधित बातमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या आठवड्यात सांगितले की अमेरिकेला याबाबत विश्वसनीय माहिती नाही. यापूर्वी अमेरिकन मीडियामध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले होते की किमशी संबंधित येणाऱ्या बातम्यांवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत.

त्याचबरोबर वृत्तसंस्था रॉयटर्सने शुक्रवारी आपल्या अहवालात म्हटले आहे की, चीनने वैद्यकीय तज्ञांची एक टीम उत्तर कोरियाला पाठविली आहे. हि टीम उत्तर कोरियामधील किमच्या प्रकृतीविषयी सल्ला देईल. तथापि, रॉयटर्सच्या अहवालात असेही म्हटले आहे की चीनकडून वैद्यकीय तज्ज्ञ पाठवण्याविषयी माहिती असूनही किमची तब्येत कशी आहे याबाबत माहिती मिळालेली नाही.

उत्तर कोरियामध्ये प्रेसना स्वातंत्र्य नाही आणि येथे सरकारशी संबंधित माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर कोरियाचे राज्य माध्यमही या संपूर्ण प्रकरणावर गप्प आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा