निरा शहरात कोरोना रुग्णांची अफवा, शहरातील बाजारपेठ उद्या नियमित वेळेत सुरू

पुरंदर, दि. १२ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या २१४ झाली असल्याने चिंता वाढत आहे. सासवड, जेजुरी व इतर गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मोठी बाजारपेठ व लोकसंख्या असलेल्या निरा शहरातील ग्रामस्थांमध्ये आज वेगवेगळ्या अफवांचा पेव फुटला होता. मात्र निरा शहरातून रविवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत एकही कोरोना लक्षणे असलेला रुग्ण तपासणीसाठी अथवा गावाबाहेरील रुग्णालयात पाठवीण्यात आला नसल्याची प्राथमिक आरोग्य केंद्र कडून देण्यात आली आहे.

पुरंदरमध्ये कोरोनाने द्विशेतकी मजल मारली आहे. त्यामुळे गावागावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांचे सासवड, जेजुरी, पुणे इतरत्र येणे-जाणे सुरू असते तर काही लोक नोकरी धंदा निमित्त सासवड पुणे येथे जात असतात. या लोकांसह इतर गावातील लोकांनाही आता काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे बहुतांश गावांमध्ये आपल्या गावात कोणी रुग्ण आहे का ? किंवा आढळला आहे का ? याची माहिती जाणून घेण्यासाठी हे लोक माध्यमांच्या प्रतिनिधींना सतत फोन करत असतात व खात्री करून घेतात आहेत.

असाच काहीसा प्रकार आज दिवसभरात दिसून आला निरा येथील प्रभाग ३ मध्ये व प्रभाग ६ मध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची जोरदार अफवा दिवसभर सुरू होती. तर काही रुग्णालयांना ही सिल केल्याची मोठी अफवा ग्रामीण भागांमध्ये होती. मात्र रविवार असल्याने काही रुग्णालयांनी आज दुपारच्या वेळेत रुग्णालय बंद ठेवली होती. असे चित्र दिसल्याने या अफवेला दुजोरा मिळाला होता. त्यामुळे याची खात्री माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घेतली.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन-तीन दिवसात एकही संशयित रुग्ण सासवड, जेजुरी किंवा पुणे येथील कोरोना सेंटरमध्ये पाठविण्यात आला नसल्याचे खात्रीलायक वृत्त त्यांनी दिले आहे. कोणाही व्यक्तीला करोनाची लक्षणे आज रोजी तरी दिसत नाहीत असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे लोकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये. निश्चिंत राहावे आज रोजी पर्यंत निरा शहर करोनाच्या दृष्टीने सेफ शहर असल्याचे त्यांनी सांगितले.

निरा शहराच्या शेजारील गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे त्या परिसरातील व्यापारपेठ बंद आहेत, त्या कारणाने निरा शहरात मागील बुधवारी व गुरुवारी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वतःहून ग्रामपंचायत प्रशासनाला जनता कर्फ्यू जाहीर करण्याचे निवेदन केले होते. ही गर्दी धोक्याची घंटा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने निर्णय घेत शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसात जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्याला व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. पुणे जिल्हाधिकारी यांनी मंगळवारपासून पुणे शहरात व परिसरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यांमध्ये हा लॉकडाऊन लागू असेल याबाबत संदिग्धता आहे. तहसीलदार पुरंदर यांना याबाबत विचारले असता जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबत कोणतीही मार्गदर्शन अजून पर्यंत मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मंगळवारी निरा बाजारपेठ बंद राहील की चालू राहील याबाबत साशंकता आहे.

मात्र निरा येथील मागील तीन दिवसांपासून चालू असलेला जनता कर्फ्यू रविवारी संपत आहे. सोमवारी बाजारपेठ सकाळी दहा वाजता सुरू राहणार आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नियमित सुरू राहणार आहे त्यामुळे गर्दी होण्याची शंका आहे. यावेळी लोकांनी गर्दी करु नये व सोशल डिस्टंसिंग तंतोतंत पालन करावे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा