गोल पोस्ट इतर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी RTO ची मोठी भेट! ‘पक्के लायसन्स’ आता थेट तुमच्या...

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी RTO ची मोठी भेट! ‘पक्के लायसन्स’ आता थेट तुमच्या तालुक्यात!

पिंपरी-चिंचवड २८ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक उपक्रम हाती घेतला आहे. RTO मध्ये लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि महिनोनमहिने चालणारी प्रतीक्षा यातून मुक्ती देण्यासाठी, डिसेंबर महिन्यात खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा या तालुक्यांच्या ठिकाणी पक्क्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही थेट तालुक्यांच्या ठिकाणी हे शिबिर आयोजित करत आहोत.” या शिबिरांमध्ये नागरिकांना जागेवरच ड्रायव्हिंग टेस्ट देता येईल आणि लगेचच पक्के लायसन्स मिळेल, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि कष्ट वाचणार आहेत.

या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग आज, शुक्रवार (दि. २८ नोव्हेंबर) रोजी दुपारी ५ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्वरीत आपला स्लॉट बुक करणे आवश्यक आहे. शिबिरांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे: खेड (१, २ आणि ३ डिसेंबर), मंचर (८, ९ आणि १० डिसेंबर), जुन्नर (१५, १६ आणि १७ डिसेंबर), वडगाव मावळ (२२ व २३ डिसेंबर) आणि लोणावळा (२९ आणि ३० डिसेंबर २०२५). नागरिकांनी शिबिरासाठी येताना आपले आधारकार्ड, लर्निंग लायसन्स, रहिवासी पुरावा आणि आवश्यक शुल्क सोबत ठेवावे, असे आवाहन RTO कडून करण्यात आले आहे.

या विशेष शिबिरामुळे ग्रामीण भागातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version