रशियाचा युक्रेनच्या रेल्वे स्टेशनवर हल्ला, १५ ठार; ५० जखमी

Russia Ukraine War, २५ ऑगस्ट २०२२: युक्रेन वरील रशियाच्या हल्ल्याला बुधवारी २४ ऑगस्ट रोजी सहा महिने पूर्ण झाले. याबरोबरच काल युक्रेनचा स्वातंत्र्य दिवस देखील होता. मात्र रशियाच्या हल्ल्याच्या भीतीने युक्रेन सरकारने कडक बंदोबस्त ठेवला होता व बाहेर पडण्यास मज्जाव ठेवला होता. यामुळं स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणतंही मोठं आयोजन नागरिकांनी केलं नव्हतं. दिवसा अखेर युक्रेन सरकारने केलेला अनुमान योग्य ठरला. पूर्व युक्रेन मधील एका रेल्वे स्टेशनवर रशियाने केलेल्या रॉकेट हल्ल्यात १५ युक्रेन नागरिक ठार झाले.

३१ वर्षांपूर्वी झाला युक्रेनचा पुनर्जन्म

कीवच्या मध्यभागी असलेल्या एका स्मारकासमोर उभं राहून अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनचा पुनर्जन्म ३१ वर्षांपूर्वी झाला होता. त्या दिवशी ते मॉस्कोच्या नियंत्रणातून बाहेर पडले आणि स्वतंत्र युक्रेनची निर्मिती झाली. युक्रेनचं हे स्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवलं जाईल.

झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित केलं

पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक प्रांतातील चॅप्लिन शहरातील रेल्वे स्टेशनवर बुधवारी रशियन रॉकेट हल्ल्यात १५ लोक ठार आणि ५० जखमी झाले. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्हिडिओ लिंकद्वारे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करताना ही माहिती दिली. कर्फ्यू दरम्यान, खार्किव आणि डोन्स्क प्रांतातील युद्धग्रस्त भागात बुधवारी गोळीबार सुरूच होता. युक्रेनच्या दक्षिणेकडील अनेक शहरांमध्ये संघर्ष सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा