भारत-रशियातील वार्षिक शिखर परिषद दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारीतील सर्वोच्च संवाद यंत्रणा

नवी दिल्ली, १० डिसेंबर २०२२ : वार्षिक भारत-रशिया शिखर परिषद ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांना भेटणार होते; परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे यावर्षी भेट होण्याची शक्यता नाही. पंतप्रधान मोदी अण्वस्त्राच्या धोक्यामुळे पुतिन यांना भेटत नसल्याच्या बातम्या निराधार आहेत.

भारतीय पंतप्रधान आणि रशियाचे अध्यक्ष यांच्यातील वार्षिक शिखर परिषद ही दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीतील सर्वोच्च संस्थात्मक संवाद यंत्रणा आहे.
युक्रेन युद्धात अण्वस्त्रे वापरण्याच्या रशियन अध्यक्षांच्या कथित धमक्यांमुळे वार्षिक वैयक्तिक शिखर परिषद रद्द करण्यात आल्याचा अंदाज अनेक माध्यमांनी वर्तविला आहे. नवी दिल्ली आणि मॉस्को यांच्यातील बैठक वेळापत्रकाच्या समस्यांमुळे होणार नाही, या निर्णयाचा युक्रेनच्या चालू संघर्षाशी काहीही संबंध नाही.

वर्ष २००० पासून भारत आणि रशियाने वार्षिक शिखर परिषद व्यवस्था राखली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये शेवटची वार्षिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यात पुतिन यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली होती. यावर्षी पंतप्रधान मोदी शिखर परिषदेसाठी मॉस्को येथे जाणार होते; पण कोरोनामुळे, २०२० मध्ये वैयक्तिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली नाही. २०२१ मध्ये पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी पहिला द्विस्तरीय संवाद साधला आणि २०२२ साठी लष्करी – तांत्रिक सहकार्य व्यवस्थेअंतर्गत इंडो- रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडमार्फत ६,०१,४२७ असॉल्ट रायफल्स AK-२०३ च्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली. भारत-रशिया या दोन देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमधील पहिली बैठक झाली.

यावर्षी सप्टेंबरमध्ये उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेच्या बाजूला जेव्हा दोन्ही नेते द्विपक्षीय बैठकीसाठी भेटले तेव्हा पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष पुतिन यांना सांगितले, की हे ‘युद्धाचे युग नाही.’ इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या G-20 शिखर परिषदेतही पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा उल्लेख करण्यात आला होता. १७ नोव्हेंबर रोजी रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री सर्गेई वर्शिनिन यांचे भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी नवी दिल्ली येथे स्वागत केले आणि सचिव (पश्चिम) संजय वर्मा यांच्याशी त्यांनी परराष्ट्र धोरणावर विस्तृत चर्चा केली. चर्चेनंतर भारत आणि रशियाने संयुक्त राष्ट्रात दहशतवादविरोधी मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्यास आणि द्विपक्षीय समन्वय वाढवण्यास सहमती दर्शविली. वर्शिनिन यांनी डिसेंबर २०२२ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आगामी अध्यक्षपदासाठी भारताचे अभिनंदन केले. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार भारत आणि रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यावरील मुद्द्यांवर आणि अलीकडील घडामोडींवर व्यापक चर्चाही केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड