रशिया-युक्रेनने धान्य निर्यात करारावर केले स्वाक्षरी, ब्लॅक सी मार्गे धान्य निर्यात पुन्हा सुरू होणार

रूस २३ जुलै २०२२ : २४ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या रूस-यूक्रेन युद्धा मुळे संपूर्ण जग खाद्य संकटाला सामोरे जात होते. आता या संकटाला विश्राम लागणार आहे देशांतर्गत करार करण्यात आले आहे यानंतर ब्लॅक सी मार्गाने धान्याचे निर्यात पुन्हा करता येणार आहे.

महत्वाचे म्हणजे या करारासाठी तुर्की आणि संयुक्त राष्ट्रांनी महत्वाचे भूमिका पार पाडले होते, तुर्कीचे राष्ट्रपती तैयप एर्दोगन यांचे प्रवक्ता इब्राहिम कालिनी यांनी एका ट्वीटद्वारे म्हंटले कि ‘ जागतिक अन्न सुरक्षेसाठी धान्य निर्यात करार महत्त्वाचा आहे ‘. या करारावर इस्तांबुल मध्ये स्वाक्षरी करण्यात आले या बैठकीदरम्यान संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस, युक्रेन आणि रशियाचे शिष्टमंडळ आणि UN चे अध्यक्ष तैयप एर्दोगन उपस्थित होते.

कराराचे प्रमुख मुद्दे

* ब्लॅक सी मध्ये अडकलेल्या धान्याने भरलेली जहाजे आता निर्यातीसाठी निघू शकतील

* रशियन सैन्य युक्रेनच्या बंदरांवर हल्ला करणार नाही.

* रशियन शस्त्रे युक्रेनमध्ये आणली जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी तुर्की आणि संयुक्त राष्ट्र जहाजांची तपासणी करतील.

* रशियन धान्य आणि खते ब्लॅक सीतून निर्यात करण्यास सक्षम असतील.

न्युज अनकट प्रतिनिधी : एस राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा