रशिया- युक्रेन तणाव वाढला…

पुणे, २१ ऑगस्ट २०२२ : रशिया युक्रेन युद्धाचा तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता युक्रेनने रशियाला विविध प्रकारांनी नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नुकताच युक्रेनने रशियाचा हवाई तळ उडवून दिला आणि रशियाला धक्का दिला. त्याचबरोबर युक्रेनने रशियाबरोबर मोठी चाल खेळली. साकी एअरबेसवर हा हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र रशियाचे मोठे नुकसान झाल्याचे रशियाने जाहीर केले आहे.

रशियाचे पंतप्रधान पुतिन यांचा राईट हॅंण्ड समजल्या जाणाऱ्या अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी डारिया दुगिन हिचा कारच्या बॉम्बस्फोटात मृत्यू करण्यात आला. वास्तविक ही हत्या अलेकझांडर यांच्यासाठी रचण्यात आल्याचा रशियाला संशय आहे. अचानक निघताना अलेक्झांडर यांनी कार बदलली आणि ते दुसऱ्या कारमध्ये जाऊन बसले. त्यामुळे ते या अपघातातून बचावले तर त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला.

तर दुसरीकडे युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला केला. ज्यात रशियाच्या झापोर्झियावर हल्ला झाल्याने रशियाचे अतोनात नुकसान झाले आहे. ही युक्रेनच्या विजयाची सुरुवात मानली जात आहे. या हल्ल्याचे फुटेज मिळू शकले नसल्याची माहिती माध्यमानीं दिली आहे.

पण आता युक्रेन आक्रमक झाला असून त्याचे रशियावरचे हल्ले वाढत आहेत. यात रशियाच्या लोकसंख्येवर परिणाम झाला आहे. रशियाची लोकसंख्या कमी व्हायला लागल्यामुळे, पुतिन यांनी नवा फतवा काढला आहे. ज्यात त्यांनी सांगितले आहे की, ज्या महिला दहा मुलांना जन्म देईल, अशा महिलेला १३ लाख रुपये देण्यात येतील. मदर हिरोईन असं या मोहिमेला पुतीन यांनी नाव दिलं आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढवण्यासाठी आता पुतिन अजून काय नवनवीन क्लुप्त्या शोधून काढतील, याचा विचार न करणेच बरे… पण रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव वाढत आहे. असे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा