रशिया : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी राज्यघटनेत मोठ्या दुरुस्त्या सुचवल्यानंतर पंतप्रधान दमित्री मेदवेदेव व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे.त्यामुळे राजकारणाला मोठी घडामोड घडल्याचे बोलले जात आहे.यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या या प्रस्तावाने सत्ता संतुलनात मोठे बदल होतील, असे मत दमित्रि मेदवेदेव यांनी व्यक्त केले आहे.यावेळी मेदवेदेव म्हणाले की, या बदलांमुळे घटनेच्या सर्व कलमांमध्ये बदलाबरोबरच सत्ता संतुलन व अधिकारांमध्येही बदल होईल. राज्याचे कार्यकारी मंडळाचे अधिकार, विधानमंडळाचे अधिकार, न्यायपालिकेचे अधिकार या सर्वांमध्ये बदल होतील, त्यामुळेच सरकारने राजीनामा दिला आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी घटनेतील बदलांसाठी दिलेल्या प्रस्तावावर देशात मतदान होणार असून प्रस्तावाद्वारे सत्तेचा जास्त अधिकार राष्ट्रपतींच्याऐवजी संसदेकडे असणार आहे.