मॉस्को, २२ नोव्हेंबर २०२०: रशियाचे अध्यक्ष कर्करोगाशी झुंज देत आहेत असा दावा व्लादिमीर पुतीन यांच्या प्रख्यात समीक्षकांनी केलाय. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रशियन राजकारणी वलेरी सोलोवेई असं म्हणतात की, ६८ वर्षीय पुतीन यांच्या फेब्रुवारीमध्येही शस्त्रक्रिया झाली. त्याच वेळी, पुतीन यांना एक प्रकारची आरोग्य समस्या येत आहे हे तथ्य रशियन सरकारनं नाकारलं आहे.
डेली मेलच्या अहवालात असं सांगितलं गेलं आहे की, पुतीन यांच्या पोटाच्या शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दुसर्या एका स्रोतानं दिलीय. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी रशियन राजकारणी वलेरी सोलोवेई यांनीही पुतीन पार्किन्सन या आजारानं ग्रस्त असल्याचा दावा केला होता.
वलेरी सोलोवेई यांचा असा विश्वास आहे की, प्रकृती खराब झाल्यामुळं पुतीन जानेवारीत माघार घेण्याचा विचार करीत आहेत. वलेरी सोलोवेई म्हणतात की, पुतीन यांना आपली मुलगी कतरिना टिखोनोव्हा आपला उत्तराधिकारी बनवायची आहे.
वलेरी सोलोवेई यांनी असंही म्हटलं की ते डॉक्टर नाहीत किंवा या आजाराबद्दल अधिक माहिती सार्वजनिक करण्याचा त्यांचा नैतिक अधिकार नाही. त्याच बरोबर, रशियन सरकार असंही म्हणते की पुतीन यांना कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या नाही. यापूर्वी गुरुवारी पुतीन टीव्हीवर एका कार्यक्रमात असताना खोकताना निदर्शनास आले. हा व्हिडिओ नंतर एडिट केला गेला.
ब्रिटीश माध्यमांच्या वृत्तानुसार, अध्यक्षांना आजीवन खटल्यापासून वाचवण्यासाठी जेव्हा रशियामध्ये नवीन विधेयक आणलं गेलं तेव्हा पुतीन यांच्या प्रकृतीविषयी अफवा वाढू लागल्या. नव्या विधेयकानुसार हे पद सोडल्यानंतरही रशियन राष्ट्रपतींवर फौजदारी कारवाई होऊ शकणार नाही किंवा पोलिस त्यांची चौकशी करू शकणार नाहीत. राष्ट्रपतींच्या कुटुंबातील लोकांनाही अशीच सूट मिळंल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे