रशियाने तालिबानला दिलं आमंत्रण, बदलणार का जिओ पॉलिटिक्स समीकरण ?

नवी दिल्ली, 9 ऑक्टोंबर 2021: अफगाणिस्तानमध्ये सत्ता बदलल्यापासून, जगातील अनेक देश अफगाणिस्तानमधील परिस्थितीशी सुसंगत राहण्यासाठी राजनैतिक प्रयत्न तीव्र करत आहेत.  तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून भारतासह बहुतेक देशांनी आपल्या दूतावासाचे कर्मचारी अफगाणिस्तानातून बाहेर काढले होते, पण रशिया काही मोजक्या देशांपैकी एक होता ज्यांनी अफगाणिस्तानातून आपला दूतावास बंद केला नाही किंवा रशियाने तालिबान सरकारला पाठिंबा दिला नाही.  आता रशिया तालिबानला मॉस्कोमध्ये येण्याचं आमंत्रण देत आहे.
अफगाणिस्तानसाठी रशियन राष्ट्रपतींचे विशेष दूत जमीर काबुलोव यांनी याची पुष्टी केलीय.  रशियन पत्रकारांनी झमीरला विचारले की तालिबानला देखील अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय परिषदेत आमंत्रित केले जाईल का?  ते म्हणाले की, रशिया तालिबानला 20 ऑक्टोबर रोजी मॉस्को येथे अफगाणिस्तानवरील आंतरराष्ट्रीय चर्चेसाठी आमंत्रित करणार आहे.  हे लक्षात घेण्यासारखं आहे की यापूर्वी मार्चमध्ये, अफगाणिस्तान समस्येवर आंतरराष्ट्रीय परिषद मॉस्कोमध्ये बोलावण्यात आली होती.  यामध्ये रशिया, अमेरिका, चीन आणि पाकिस्तानने संयुक्त निवेदन जारी करून अफगाणिस्तानातील सर्व पक्षांना हिंसा थांबवण्याचा आणि शांतता करार करण्याचा आग्रह केला आहे.
रशिया अफगाणिस्तानला मदत देण्याच्या तयारीत
संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने बुधवारी इशारा देताना सांगितलं की, अफगाणिस्तानमधील मानवतावादी संकट वाढतच चाललं आहे, त्यामुळं रशियाही अफगाणिस्तानला मदत देईल का?  यावर बोलताना काबुलोव म्हणाले की, रशिया अफगाणिस्तानला मदत करेल, परंतु आजपर्यंत या मुद्द्यावर पूर्णपणे अंतिम निर्णय झालेला नाही आणि त्यावर काम केले जात आहे.
एक तर तालिबानवर रशियात दहशतवादी संघटना म्हणून बंदी घालण्यात आली आहे, तर दुसरीकडं रशियन प्रशासन तालिबानशी चर्चेसाठी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारत आहे.  काबुलोव यांनी याबद्दल सांगितलं की तालिबानवर लादलेले संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध हटवण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही.  ते म्हणाले की ज्या टप्प्यावर आपण सध्या आहोत, मला वाटतं की आत्ता कोणत्याही प्रकारची घाई करणे योग्य नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा