चीननंतर रशियाचा तालिबानला पाठिंबा, काय म्हणाले पुतीन?

काबूल, 18 सप्टेंबर 2021: ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे झालेल्या परिषदेत पुतिन यांनी व्हिडीओ लिंकच्या मदतीनं भाषण केलं.  पुतिन म्हणाले की, रशियाने अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्र परिषदेला पाठिंबा दिलाय.  याशिवाय जगातील प्रभावशाली देशांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती स्थिर करण्याचाही विचार करावा.  हे लक्षात घेण्यासारखं आहे की चीननंतर रशिया हा एक शक्तिशाली देश आहे ज्यानं तालिबानला उघडपणे समर्थन दिलं आहे.
 तालिबानशी संबंध चीन आणि रशियासाठी महत्त्वाचे ठरू शकतात
असं मानलं जातं की अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या माघारीनंतर चीन आणि रशिया या देशात स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू शकतात.  चीनने यासाठी आधीच पुढाकार घेतलाय.  युरोप आणि आशियामध्ये आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी चीन आपल्या बेल्ड अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे.  याचाच एक भाग आहे चीन-पाकिस्तान इकॉनोमिक कॉरिडॉर.
 अलिकडच्या वर्षांत इराण, रशिया, ताजिकिस्तान सारख्या देशांनी या व्यापारी नेटवर्कमध्ये स्वारस्य दाखवलं आहे, परंतु अमेरिकेच्या व्याप्यामुळं अफगाणिस्तान या प्रकल्पाचा भाग बनू शकला नाही.  आता अमेरिका गेल्यानंतर चीनला आशा आहे की तालिबानसोबत मिळून तो आपला प्रकल्प पूर्ण करू शकेल.  तथापि, चीनसाठीही अनेक आव्हानं आहेत.
 जर आपण रशियाबद्दल बोललो तर मध्य आशियातील देशांमध्ये अमेरिकन सैन्याची उपस्थिती संपल्यानंतर त्याचा अफगाणिस्तानमध्ये प्रभाव वाढू शकतो.  अफगाणिस्तानात अफाट खनिज संसाधनांची उपस्थिती देखील एक मोठा घटक असू शकतो.  काबूलमधील रशियन मुत्सद्यांनी तालिबानचं वर्णन सामान्य असं केलं आणि सांगितलं की, अफगाणिस्तानची राजधानी आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा