सबरीमाला मंदिर आज उघडले

केरळ : सबरीमाला प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय स्थगित केल्याच्या काही दिवसानंतर, भगवान अयप्पा मंदिर पूजा उत्सवासाठी आज उघडण्यास तयार आहे. सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाईल, तथापि महिलांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नाही. वादग्रस्त सबरीमाला मंदिराचे दरवाजे आज वार्षिक मंडळा यात्रेसाठी उघडण्यात येणार आहेत.

विशिष्ट वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरील निर्बंधाची तीव्र टीका करणाऱ्या महिला हक्क अर्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणाल्या की, २० नोव्हेंबरनंतर महिलांनी मिंदिराला भेट दिली जाईल, येणाऱ्या महिलांच्या सुरक्षा बाबत प्रशासनाने उपाय योजना करण्यात यावी, या प्रकाराकडे प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष घालावे.
यावर प्रतिक्रिया देताना सूत्रांनी सांगितले की केरळ सरकार मंदिरात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देणार नाही.
यापूर्वीच यात्रेकरूंनी सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यास सुरवात केली आहे. आता मंदिरात महिला प्रवेश करू शकतील की नाही हे पाहण्याची गरज आहे.

सबरीमाला मुद्दा काय आहे?
१९५१ पासून ट्रांव्नकोर देवासोम बोर्डाने मासिक पाळीच्या स्त्रियांच्या प्रवेशास (१० ते ५० वर्षे दरम्यान) सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. १९६५ पासून ही अधिसूचना कायदेशीररित्या बंधनकारक होती आणि केरळ उच्च न्यायालयाने १९९१ मध्ये त्यास मान्यता दिली.
२८ सप्टेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयने महिलांसाठी मंदिर खुले केले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा