ऑस्ट्रेलिया : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच ऑस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू रिकी पॉटिंग आणि शेन वॉर्न यांनी आयोजित केलेल्या “बुशफायर क्रिकेट लीग” क्रिकेटसाठी सचिन कोच होणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
यात ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू रिकी पॉटिंग आणि शेन वॉर्न यांनी आगीत होरपळलेल्या ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी एका क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्यात कोचिंगची जबाबदारी सचिन तेंडुलकर पार पाडणार आहे.
महिन्याभरापूर्वी ऑस्ट्रेलियातील ‘अॅमेजॉन’ जंगलामध्ये काही दिवसात भिषण आग लागली होती. या आगीत जवळपास ४८ कोटी प्राणी आणि पक्षी यांना जीव गमावावा लागला.या आगीत न्यू साऊथ वेल्स या राज्याला या वणव्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे.
त्याचप्रमाणं, ऑस्ट्रेलियातील खुरट्या जंगलांमध्ये लागलेल्या आगींचं विक्राळ वणवे बनले असून, व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स या राज्यांमध्ये या वणव्यांनी हाहाकार उडवून दिला आहे. त्यामुळं ‘बुशफायर’असं या वणव्यांचं नामकरण करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी ‘बुशफायर क्रिकेट बॅश’ या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
या स्पर्धेच्या तिकीटातून जमा होणाऱ्या पैशातून ऑस्ट्रेलियातील आगीमध्ये नुकसान झालेल्या घरांच्या पुर्नवसनासाठी मदत केली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे कॉर्टिनी वॉल्श यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. या ‘बुशफायर क्रिकेट बॅश’ स्पर्धेमध्ये सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे कॉर्टिनी वॉल्श हे पॉंटिंग आणि वॉर्न संघाचे कोच असणार आहेत. ‘बुशफायर क्रिकेट लीग’ ही स्पर्धा ८ फेब्रुवारी रोजी खेळवली जाणार आहे.