कोरोना महामारीत १३०० डाॅक्टर्सचा आंदोलनचा पवित्रा….

मुंबई, दि. २० जुलै २०२०: कोरोना माहामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे तर प्रत्येक देशातील प्रशासनावर याचा ताण पडताना दिसतोय. दिवसेंदिवस कोरोनाे रुग्ण वाढत असून जगातील आरोग्य कर्मचारी हे २४ तास कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. भारतातील कोरोना परिस्थिती ही बिकट असून भारततातील लोकसंख्येच्या तुलनेेने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात भार पडल्याचे दिसत आहे.

भारततील काही रुग्ण हे प्रशासनाच्या कोणत्याच आदेशाचे पालन करताना दिसत नाहीत तर आरोग्य कर्मच्यारांबरोबर गैरवर्तवणूक देखील करत असल्याचे चित्र अनेक भागात दिसून आले. मात्र तरीही हे डाॅक्टर्स त्यांच्यावर उपचार करीत आहेत.

मात्र आता प्रशासनाचा हालगर्जीपणा समोर आल्यामुळे संतप्त १३०० डाॅक्टर्स हे अंदोलनवर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यात १८ वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांचा समावेश आहे. गेली ५ वर्ष काम करुन देखील नोकरीत कायम न केल्याने ते नाराज झाले आहेत. तर त्यांना पगारी या ५०% च देण्यात आल्या आहेत.

एकिकडे कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे कमी पगार आणि वर नोकरी कधीही जाण्याची भीती त्यांना सतावत आहे. प्रशासनाच्या हालगर्जीपणा मुळेच आज या आरोग्य सेवेतील डाॅक्टर्स वर ही वेळ ओढावली असून त्यांनी आता न्यायासाठी आंदोलनाचा पवित्रा ठरवला आहे. ज्यामुळे प्रशासनाची कोरोना काळातील डोके दुखी ही आणखी वाढल्याचे चित्र समोर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा