साध्वी प्रज्ञासिंग यांना मिळाली मोदी, शाह यांच्या फोटोवर फुली मारलेलं पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भोपाळ येथील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या फोटोवर फुली मारलेलं पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

खा. साध्वी यांना मिळालेल्या पत्राबरोबर एका चिठ्ठीत पावडर सारखा पदार्थ देखील पाठवला गेलेला आहे. तसेच मोदी, शाह, डोवाल यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे देखील फोटो आहेत. त्यातील संदिग्ध पावडरची तपासणी करण्यासाठी ते प्रयोगशाळेत (एफएसएल) देखील पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी नोंद करून घेतली असुन, पत्र पाठवणाऱ्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत प्रज्ञासिंग यांनी सांगितले की, माझ्या जीवाला धोका आहे. या अगोदर देखील अशा प्रकारचे धमकी पत्र मला आले होते. तेव्हा देखील मी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र आजपर्यंत याबद्दल कोणतीच कारवाई झाली नाही. हा देशाच्या शत्रुंचा मोठा कट असू शकतो.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा