गोल पोस्ट स्पॉटलाइट जान्हवी कपूरची भाऊक करणारी पोस्ट

जान्हवी कपूरची भाऊक करणारी पोस्ट

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट २०२०: अभिनेत्री जान्हवी कपूर हिने गुरुवारी आपली आई व दिवंगत स्टार अभिनेत्री श्रीदेवीसह आपला एक अनमोल थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. श्रीदेवीच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त , इंस्टाग्रामवर ब्लॅक आणि व्हाईट फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या आईला मीठी मारताना दिसत आहे. तसेच तिने पोस्टला “आय लव्ह यू मम्मा ” असे कॅप्शन दिले आहे.

तसेच जान्हवी कपूरच्या या पोस्टमध्ये श्रीदेवीच्या चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहत आपल्या भावना कमेंट्स करून व्यक्त केल्या आहेत. तसेच श्रीदेवीने २४ फेब्रुवारी २०१८ रोजी आपला शेवटचा श्वास दुबईमध्ये घेतला होता, तेथे ती कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी गेली होती. तसेच श्री अम्मा आयाँगर अय्यपान या नावाने जन्मलेल्या तीने ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चलबाझ’, ‘नगीना’, ‘सद्मा’ आणि ‘इंग्लिश विंग्लिश’ या हिंदी चित्रपटांमधील उत्कृष्ट भूमिकांमुळे परिचित होती.

पद्मश्री पुरस्काराने तामिळ , तेलुगू , हिंदी , मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तिचा शेवटचा चित्रपट ” मॉम” होता ज्यासाठी तिला मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी :

error: Content is protected !!
Exit mobile version