पुणे : SL Adventure नि आयोजित केलेल्या लिंगाणा मोहिमेला सुरुवात झाली. सोमवारी दि.२३ रोजी रात्री १० वाजता.आम्ही सगळे मध्यरात्री १ वाजता मोहरी या गावात पोहोचलो.
अर्धा तास आराम केल्यानंतर १:३० वाजता आम्ही लिंगाण्याकडे प्रस्थान केले. मोहरी गावातून निघाल्यावर खडतर बोराट्याची नाळ लागते. इथं सर्वात जास्त शारीरिक आणि मानसिक कस लागतो. कारण की मोठमोठी दगडे, वळणावळणाची वाट, काटेरी झुडुपे पार करावी लागतात.
बोराट्याची नाळ उतरून आम्ही लिंगाण्याच्या पायथ्याला २ तासाची पायपीट करून पोहोचलो.३:३० वाजता वजीरवीर कृष्णा मरगळे आणि अनंता मरगळे यांनी क्लाइंबिंग करून रोप लावायला सुरुवात केली.
त्यानंतर रोहित आंदोडगी आणि ६ वर्षाच्या संस्कार हृषिकेश खटावकर याने चढाईला सुरुवात केली. त्यानंतर बाकीच्या सहकाऱ्यांनी चढाईला सुरुवात केली. एक एक करत सगळे जण अंधारामध्ये वाट काढत चढाई करत होते.
त्यानंतर सुर्यनारायणाच्या दर्शनासाठी सगळे जण ६:३० वाजता तिसऱ्या टप्प्यावर असणाऱ्या गुहेत पोहोचलो.
मग नंतर सुरू झाला खरा खडतर प्रवास, समोर उभा होता. काळजात धडकी भरवणारा कातळकडा. त्यावर क्लाइंबिंग करून आम्ही सगळे जणवर गेलो.
आमच्यात एक महिला ट्रेकर अश्विनी देशपांडे होत्या. शेवटच्या टप्प्यावर त्यांना बाजूची खोल दरी बघून भीती वाटली. परंतु पण त्यांची इच्छाशक्ती कायम होती की आपण लिंगाणा सर करायचाच आणि शेवटी सगळ्यांनी एक एक करत लिंगाणा सर केलाच.
सर्वात प्रथम कृष्णा आणि अनंता ने समिट केला.त्यानंतर रोहित ने पण यशस्वी चढाई केली. नंतर ६ वर्षाच्या संस्कार मोनिका हृषिकेश खटावकर ने रोहित नंतर लिंगाण्याच्या उच्च शिखरावर पाय ठेवले आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. मग तिथून राजधानी रायगडाचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यात आला.
यासाठी SL Adventure चे संस्थापक लहू उघडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी ट्रेकचे सर्व सूत्र हातात घेऊन यशस्वीपणे सगळ्यांना सुखरूप रॅपलिंग करत खाली घेऊन आले. त्यानंतर सगळ्यांनी ट्रेकच्या आठवणी घेऊन पुण्याची वाट धरली.
यामध्ये संस्कार हृषिकेश खटावकर, ऋषिकेश खटावकर, अश्विनी देशपांडे, शैलेश थोरवे,कृष्णा मरगळे,अनंता मरगळे,रोहित आंदोडगी आणि लहू उघडे आदी उपस्थित झाले होते.