नवी दिल्ली, १ जून २०२३ : दिल्लीतील १६ वर्षीय साक्षी खून प्रकरणातील आरोपी साहिल याला दिल्ली पोलिसांकडून आज सकाळी कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान कोर्टाने साहिल याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती ऑर्थर नॉर्थचे डीसीपी रविकुमार सिंग यांनी दिली आहे.
साहिल खान आणि साक्षी जून २०२१ पासून मित्र होते. त्यानंतर साक्षी साहिलला टाळू लागली. ती दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याचा संशय साहिलला येऊ लागला. काही दिवसांपूर्वीच त्यांने साक्षीला ठार मारण्याची धमकी दिली होती. साक्षीने तिच्याकडून साहिलसोबत ब्रेकअप केला होता; पण साहिल तिचा पिछा सोडत नव्हता. शनिवारीही दोघांमध्ये वाद झाला आणि रविवारी साहिलने साक्षीला संपविले.
साक्षीच्या हत्या केल्यानंतर साहिल बुलंद शहर जिल्ह्यातील रिठाळा या गावी त्यांच्या आत्याच्या घरी दडून बसला होता. स्वतःचा फोनही त्यांने बंद करून ठेवला होता. साहिल येथे आलेला आहे म्हणून आत्याने भावाला फोन केला. सर्फराज यांचा फोन पोलिसांनी ट्रँकवर लावून ठेवलेला होता. साहिल कुठे आहे, हे पोलिसांना कळाले. यानंतर पोलिसांनी साहिल याला ताब्यात घेतले. आज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर