गोल पोस्ट राजकारण साई दर्शनाने मिळते प्रेरणा : शिवराजसिंग चौहान

साई दर्शनाने मिळते प्रेरणा : शिवराजसिंग चौहान

शिर्डी : आपण गेल्या २३ वर्षांपासून अखंडितपणे शिर्डीला साईंच्या दर्शनाला येत आहोत. नववर्षाच्या प्रारंभाला साई दर्शनाने उत्साह वाढून कामाची प्रेरणा मिळते. हाच उत्साह व प्रेरणा वर्षभर समाजसेवेसाठी करण्यास नवी ऊर्जा मिळत असते, असे मध्यप्रदेश माजी मुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले.
शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी हे मत मांडले. यावेळी संस्थानतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी शिवराजसिंग चौहान यांचा सत्कार केला. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, माजी विश्वस्त अशोक खांबेकर उपस्थित होते.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नव्या वर्षाचे स्वागत साई दर्शनाने व्हावे. यासाठी शिर्डीत शिवराजसिंग सहकुटूंब शिर्डीत आले. साई दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी शिवराजसिंग चौहान म्हणाले की, सबका मलिक एक व श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांचा संदेश संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहे. त्याच संदेशाचे आपण आपल्या जीवनात आजवर आचरण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version