गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘दी लास्ट कलर’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या यादीत

‘दी लास्ट कलर’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या यादीत

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दी लास्ट कलर’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत सामील झाला आहे. याच चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल ठेवलेल्या दिग्दर्शक विकास खन्ना यांनीच याबाबतची माहिती ट्विटरवर दिली.
या चित्रपटाला या वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील “बेस्ट फीचर फिल्म” या विभागात नामांकन मिळाले आहे.

‘दी लास्ट कलर’ या चित्रपटाला या विभागातील ३४४ चित्रपटांमधून नामांकित करण्यात आले आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटाला ऑस्करचे नामांकन मिळाल्यामुळे विकास खन्ना हे खूपच खूश झाले आहेत.

ट्विटरवरील आपल्या पोस्टमध्ये विकास खन्ना म्हणतात की, २०२० ची सुरुवात तर चांगली झाली. ऑस्कर अकादमीने २०१९ मधील सर्वोत्तम ३४४ सिनेमांची घोषणा केली. यात माझ्या ‘द लास्ट कलर’ या चित्रपटाचा समावेश आहे. साऱ्यांना धन्यवाद! त्यांच्या या ट्विटनंतर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले की, ‘विश्वास बसत नाहीये. मला खूपच आनंद झाला आहे.’

error: Content is protected !!
Exit mobile version