गोल पोस्ट कट्टा आध्यात्मिक साई मंदिर दर्शनासाठी राहणार बंद

साई मंदिर दर्शनासाठी राहणार बंद

शिर्डी : २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण असल्‍यामुळे श्री साईबाबा समाधी मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल करण्‍यात आला आहे.
सकाळी ८ ते सकाळी ११ या वेळेत दर्शनासाठी समाधी मंदिर बंद ठेवण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

यावेळी मुगळीकर म्‍हणाले २६ डिसेंबरला सकाळी ८.५ ते सकाळी ११ या काळात कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. त्‍यामुळे श्री साईबाबा समाधी मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांमध्‍ये बदल करण्‍याबाबतचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला आहे. सर्व साई भक्तांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन यावेळी साई प्रतिष्ठांनकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version