साई सुदर्शनने रचला इतिहास;गुजरातचा राजस्थानवर ५८ धावांनी विजय..

21
Sai Sudharsan leads Gujarat Titans to a historic 58-run win over Rajasthan Royals in IPL. With a powerful knock of 82 runs, he sets a record as the first Indian batter to score 50+ runs in five consecutive innings at the same IPL venue, Narendra Modi Stadium.
साई सुदर्शनने रचला इतिहास

Sai Sudarshan Record in IPL: साई सुदर्शनच्या शानदार ८२ धावांच्या खेळीने गुजरात टायटन्सने राजस्थानवर मोठा विजय मिळवला आहे. गुजरात संघाने आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव केला.प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरात संघाने २० षटकांत २१७ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, ज्यामध्ये साई सुदर्शनच्या दमदार खेळीचे मोठे योगदान आहे. याशिवाय त्याने या सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

साई सुदर्शनने आयपीएल मध्ये असा इतिहास रचला असून या स्पर्धेत तो कोणत्याच भारतीय फलंदाजाला करता आलेला नाही. त्याने एकाच आयपीएलच्या मैदानावर सलग पाच वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुदर्शनने २०२४ मध्ये ५० पेक्षा जास्त धावांचे सलग दोन डाव खेळले होते. त्यानंतर, आता यावर्षी त्याने याच मैदाणात सलाग तीन वेळा ५० पेक्षा जास्त धावांचा डाव खेळला आहे. २०१८ ते २०१९ मध्ये असा इतिहास दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलर्सने आरसीबीकडून खेळताना असा पराक्रम केला होता.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1909976403832881180

साई सुदर्शनने यंदाच्या आयपीएलमध्ये अहमदाबादमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध ७४ धावांची खेळी केली. यांनंतर, त्याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात याच मैदानात ६३ धावांची दमदार खेळी केली होती. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो ४९ धावांवर बाद झाला, पण तो सामना बंगलोर मध्ये खेळवण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा