श्रीलंकेला मोठा धक्का, कर्णधार दासुन शनाका वर्ल्डकपमधून बाहेर

पुणे, १६ ऑक्टोंबर २०२३ : श्रीलंकेचा वनडे कर्णधार दासून शनाका मांडीच्या दुखापतीमुळे भारतात सुरू असलेल्या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी स्टैंडबाय खेळाडूंच्या यादीत सामील झालेल्या चमिका करुणारत्नेचा संघात समावेश करण्यात आला. या खेळाडूची दुखापत हा श्रीलंकेसाठी मोठा धक्का आहे. मात्र, श्रीलंकेने विश्वचषकात अद्याप एकही सामना जिंकलेला नाही.

माहिती देताना आयसीसीने सांगितले की, कर्णधार दासुन शनाका दुखापतीमुळे करुणारत्नेचा संघात समावेश करण्यात आला. उजव्या मांडीच्या स्नायूच्या दुखापतीमुळे शनाका १० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या श्रीलंकेच्या सामन्यातून बाहेर पडला होता. यानंतर २३ एकदिवसीय सामने खेळलेल्या चमिका करुणारत्नेचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी चमिका करुणारत्नेला बदली म्हणून निवडण्यात आले होते. मात्र, कर्णधार दासुन शनाकाला दुखापतीतून बरे होण्यासाठी किमान तीन आठवडे लागतील.

कुसल मेंडिसला उपकर्णधारावरून संघाच्या कर्णधारपदी बढती देण्यात आली आहे. श्रीलंकेसाठी कुसल मेंडिसने चांगली कामगिरी केली. शनाकाच्या अनुपस्थितीमुळे करुणारत्नेला विशेष संधी मिळाली आहे. चमिका करुणारत्नेने या वर्षी मार्चपासून श्रीलंकेसाठी एकही वनडे खेळलेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा