साईबाबा जन्मस्थळावरून राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

अहमदनगर: पाथरी हेच साईबाबा यांचे जन्मस्थळ आहे, त्यामुळे पाथरीचा विकास जन्मस्थळ म्हणून व्हावा, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी घेतली आहे.
‘राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात पाथरीला जन्मस्थळ म्हणून निधी द्यावा, अशा सूचना केल्या होत्या.
राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च प्रमुख आहेत. त्यांच्या आदेशाचे पालन झाले पाहिजे. पाथरीचा विकास साई जन्मस्थळच्या दृष्टीने व्हावा,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक होण्याची शक्यता आहे.
पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर शिर्डीतील ग्रामस्थांनी बंदची हाक दिली होती.
सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिर्डीतीच्या ग्रामस्थांची मुंबईत बैठक झाली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर शिर्डीतील ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा