ओली यांच्याविरोधात नेपाळ मधील संतांनी केले प्रदर्शन

25

जनकपुर (नेपाळ), दि. १९ जुलै २०२०: भारत आणि नेपाळ मधील असलेले सांस्कृतिक संबंध तोडण्याच्या प्रयत्नात असलेले नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आता चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आपली खुर्ची गमवावी लागते की काय या भीतीने आता त्यांनी बचावात्मक धोरण स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. राम जन्मभूमी वर केपी शर्मा ओली यांच्या विवादात्मक वक्तव्यानंतर पॉली राजकीय पटलावर चांगलेचटीकेला सामोरे जाताना दिसले. त्यानंतर नेपाळमधल्या जनता देखील त्यांच्या विरोधात टीका करण्यास सुरुवात करायला लागली होती आणि त्यातच आता नेपाळमधील संत मंडळीदेखील ओली यांच्यावर आपला संताप व्यक्त करत आहेत.

राम जन्मभूमी आणि राम यांच्यावर केलेल्या विवादात्मक वक्तव्यानंतर काल १८ जुलै रोजी नेपाळमधील संत केपी शर्मा ओली त्यांच्याविरोधात आक्रोश दर्शवत रस्त्यावर उतरले होते. या संतांनी जनकपुर येथे आपल्या पंतप्रधान विरोधात आक्रोश दर्शवत प्रदर्शने केली. या प्रदर्शनामध्ये सहभागी असलेले साधुसंत आणि सामान्य जनतेने अशी मागणी केली आहे की केपी शर्मा ओली यांनी केलेले विधान परत घ्यावे.

जनकपूर आणि अयोध्याचा संबंध कायम ठेवण्यासाठी निषेध करणार्‍या संत आणि नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी पंतप्रधान ओली यांना संदेश दिला की त्यांनी हिंदूंच्या श्रद्धा दुखावू नयेत. विशेष म्हणजे नुकतीच नेपाळीच्या आदिकावि भानुभक्त यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ओली यांनी भगवान राम यांना नेपाळी नागरिक म्हणून वर्णन केले होते.

त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन करताना ओली म्हणाले होते की, ज्या अयोध्या बद्दल बोलले जाते ते देखील भारतात नसून ते नेपाळमध्येही आहे. तसेच त्यांनी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अतिक्रमणाचा आरोप केला. ओली यांच्या वक्तव्यावर अयोध्येतील ऋषी-संतांनीही कडक टीका केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी