सकल बहुजन समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन

लोणी काळभोर : अकोला व नांदेड येथील मातंग समाजाच्या मुलीवर गाव गुंडाकडून व दोन शिक्षक नराधमांकडून बलात्कार करण्यात आला.अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील सकल बहुजन समाजाच्या वतीने लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना निवेदन देण्यात आले.
अकोला येथील मातंग मुलीवर गावातील गावगुंडानी अमानुष व पाशवी बलात्कार केला असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यापैकी एकच आरोपी अटक असून बाकीचे नराधम आजरोजी पर्यत फरार आहेत. आणि सदर पीडितेवर व तिच्या कुटूंबियावर सदर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्याच प्रमाणे नांदेड येथील मा8तंग मुलीवर शाळेतीलच दोन नराधम शिक्षकांनी पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
संपूर्ण देशात स्त्रीशक्तीचे विचार सांगितले जाऊन त्यांना आदरस्थानी मानले जाते मात्र खऱ्या जगामध्ये आजही स्त्रीला फक्त एक भोगवस्तू समजले जात आहे. व कायद्यांची कोणतीही पर्वा न करता असे घृणास्पद पाशवी बलात्कार रोजच घडत आहेत. उच्च न्यायालयाने निर्भय बलात्कार प्रकरणातील आरोपींना फासावर लटकविण्याचे आदेश देऊन अशा नराधमांना समाजात जगण्याची व समाजात राहण्याची लायकी नाही असे सांगितले आहे. व अशा नराधमामुळेच देशातील स्त्री सुरक्षित नाही. याच धर्तीवर वरील नराधमाच्या मुसक्या आवळून त्यांना लवकरात लवकर अटक करून सदर खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवून या नराधमांना भर चौकात फासावर लटकवून अन्याय पीडित मुलींना न्याय मिळवून द्यावा.
स्त्रीला समाजात सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी अश्या नराधमांना वेळीच फासावर लटकून ही काळाची गरज आहे. अशा घटनेचा संपूर्ण सकल बहुजन समाज अतिशय तीव्र शब्दात निषेध करत आहे. त्यावेळी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील सकल बहुजन समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा