गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा मेढा येथे सकल धनगर समाजाचा मोर्चा, आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

मेढा येथे सकल धनगर समाजाचा मोर्चा, आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

सातारा १८ डिसेंबर २०२३ : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा, तसेच आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, यासाठी जावळी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आज तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.

यावेळी संपूर्ण जावळी तालुक्यातून धनगर समाज बांधव या मोर्चासाठी मेढा येथे दाखल झाले. गेल्या ७५ वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहिला असुन शासनाने अनेक वेळा आश्वासने देऊन धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. याप्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाज बांधवानी या धडक मोर्चाचे आयोजन केले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

error: Content is protected !!
Exit mobile version