गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक मनमाडच्या ‘गुप्तसर साहेब गुरुद्वारा’ मध्ये ‘सालाना जोड-मेला’ मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाडच्या ‘गुप्तसर साहेब गुरुद्वारा’ मध्ये ‘सालाना जोड-मेला’ मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड, नाशिक १८ डिसेंबर २०२३ : नाशिकच्या मनमाड मधील श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘गुप्तसर साहेब गुरुद्वारा’ मध्ये श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या ३५७ व्या पावन प्रकाश पूरब निमित्ताने आयोजित ‘सालाना जोड-मेला’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी भजन,कीर्तन,लंगर आदी धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. सालाना जोडमेला निमित्ताने भव्य स्वरूपात नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले, यामध्ये तलवारीबाजीसारखे साहसी खेळ खेळणारे पथक, पंजाबी बँड, ढोल-ताशा आदी पथकांसह पवित्र रथ सहभागी होते. या उत्सवामध्ये अनेक राज्यातील शीख बांधव, मान्यवर आणि कलाकार सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version