सकपाळ फाउंडेशन व दुर्वा एड्युटेंमेंट प्रोडक्शन कडून तीन दिवसीय मोफत अभिनय शिबिराचं आयोजन

टिटवाळा, 8 जुलै 2022: डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ फाउंडेशन व दुर्वा एड्युटेंमेंट प्रोडक्शन हाउस आयोजित तीन दिवसीय मोफत निवासी अभिनय शिबिर नुकताच स्वामी फार्महाऊस, टिटवाळा येथे पार पडला. या शिबिराचे उद्घाटन लेखिका सुनिता तांबे व रुपाली चेऊलकर यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच उद्घाटनप्रसंगी भिवंडी निजामपूर महानगर पालिका माजी नगरसेवक नितीन बजागे साहेब यांनी देखील उपस्थित राहून सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या, संस्थेमार्फत त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देण्यात आले.

सदर शिबिरामध्ये मुंबई, पुणे, कोकण अश्या वेग वेगळ्या ठिकाणाहून कलाकारांनी हजेरी लावली होती. संपुर्ण शिबीर अतिशय उत्साहात व आनंदात पार पडलं. या शिबीरासाठी प्रशिक्षक म्हणुन सिने-नाट्य लेखक व दिग्दर्शक श्री. सुनील परब सर लाभले होते हे आमच्या संस्थेचे व सर्व कलाकारांचे भाग्यच म्हणावे लागेल, कारण सरांनी तीन दिवस तन, मन, धन पनाला लावुन सर्व कलाकरांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यातुनच त्यांची कामाप्रती, कला क्षेत्राप्रती असलेली निष्टा साफ दिसत होती, त्यांची प्रामाणिक तळमळ त्यांच्या शिकवण्यात जाणवत होती त्यामुळं या संपुर्ण कार्यशाळेचे श्रेय सुनील परब सरांनाच जाते.

या तीन दिवसीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ फाउंडेशन व दुर्वा एड्युटेंमेंट प्रोडक्शन हाउसचे संस्थापक डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांनी केलं होतं, त्यांनी सर्व सहभागी कलाकारांना प्रमाणपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा