एसटी कर्मचा-यांचा पगार लवकरच होणार, आता प्रवासा दरम्यान लागणार नाही ई पास….

मुंबई, ५ ऑगस्ट २०२०: गेल्या अनेक दिवसांपासून राज्याने हजारो एसटी कर्मचा-यांना पगारीच्या नावा खाली हातावर उक्त नारळच दिला होता. तर इतर एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा शिल्लक नव्हते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

अखेर ठाकरे सरकारने एसटी कर्मचा-यांचा पगारीचा प्रश्न हा मार्गी लवाला असून आता राज्यातील एसटी कर्मचा-यांचा पगार लवकरच होणार असल्यची आंनदाची बातमी समोर आली आहे. हि माहिती ट्विटर वरुन राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. त्यासाठी राज्य सरकारने ५५० कोटीं रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

आता लागणार नाही ई पास….

राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रवासा दरम्यानच्या महत्वाचे काही निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये कोकणातील गणेशउत्सवाचा सहभाग आहे.

१) एसटी हाच आता ई पास, एसटी नसेल तर ई पास बंधनकरक

२) मुंबईतील लोक १० दिवस क्वारंन्टाईन.

३) कोकणातील गणपतीसाठी कोकणवासीयांनी व चाकरमान्यांनी १२ ऑगस्ट पर्यंत पोहचावे.

४) २२ जण एकत्र आले तर गावापर्यंत एसटी.

५) मात्र बस हि कुठेही थांबणार नाही,जेवायला देखील थांबणार नाही.

६) खासगी बसला दीडपट पेक्षा जास्त तिकीट नको.

या महत्वपुर्ण घोषणा राज्यपरिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा