पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांचे दिल्लीहून आयोध्याकडे प्रयाण

आयोध्या, ५ ऑगस्ट २०२० : आयोध्याच्या बाबतीत आजचा दिवस ऐतिहासिक दिवस मानला जाईल. आज ५ ऑगस्ट रोजी अायोध्येतील प्रस्थापित राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे व त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीहुन आयोध्याकडे रवाना झाले आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील अयोध्येत पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत.

राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी अयोध्या सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११.३० वाजता अयोध्येत पोहोचतील. भूमिपूजनाची शुभ वेळ ही दुपारी १२.४४ वाजता आहे. त्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रामजन्मभूमी संकुलातील परिसर रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. रामजन्मभूमी संकुलातील सुरक्षा व्यवस्थेची सर्व कमान एसपीजीने आपल्या हातात घेतली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा कोड तपासून प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा