Sale of Gutkha at Syed Nagar Innovative School Area: पुण्यातील हडपसरमधील सय्यद नगर येथील इनोव्हेटिव्ह शाळेच्या परिसरात अनधिकृत टपऱ्या मध्य रात्री २ वाजेपर्यंत सुरू असतात. यामध्ये प्रामुख्याने गुटखा, सिगारेट आणि तंबाकू सारख्या मादक पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. शालेय परिसराच्या जवळच असलेल्या या टपऱ्यांमध्ये 18 वर्षाखालील मुलांना हानिकारक पदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. यामुळे शालेय विद्यार्थी व्यसनाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता अधिक असते.
काय सांगतो कायदा :
कोटपा कायदा, २००३ (COTPA – The Cigarettes and Other Tobacco Products Act, 2003)
- कलम ६: १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे गुन्हा आहे.
- कलम ४: सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे.
- कलम ५: तंबाखूजन्य पदार्थांचे जाहिरातबाजी आणि प्रोत्साहन देणे बेकायदेशीर आहे.
सय्यद नगरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना गुटखा आणि सिगारेटची विक्री होत असल्याने COTPA कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे.
याचबरोबर या परिसरात महिलांना व मुलांना सुरक्षेचा धोका निर्माण होतो, कारण टपऱ्यांमध्ये होणारी गर्दी आणि अव्यवस्थित वाहतूक यामुळे परिसरात कोंडी निर्माण होऊन सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. बेशिस्त वाहनचालक आपल्या वाहनांंना कुठेही पार्क करतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी व दुर्घटनांचा धोका वाढतो.स्थानिक नागरिकांनी या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; पुणे