सलमान खानच्या ‘टायगर ३’चा दमदार टीझर रिलीज

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर ३’ बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. ज्या दिवसाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस अखेर आला. ‘टायगर ३’ चा टीझर आज म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटाच्या टीझरमध्ये सलमान खान एक खास संदेश देताना दिसत आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त ‘टायगर ३’ मध्ये इमरान हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात शाहरुख खानचा क्रॉस ओव्हर असणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘टायगर ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत असून आदित्य चोप्रा त्याची निर्मिती करत आहेत. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘टायगर ३’ हा ब्लॉकबस्टर फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. त्याचा पहिला भाग ‘एक था टायगर’ २०१२ मध्ये आणि ‘टायगर जिंदा है’ २०१७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. आता यशराज फिल्म्सला (YRF) ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या काळातच ‘टायगर ३’ चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा