२ ऑक्टोबरला गांधी मरत नसतो या दीर्घ लघुचित्रपटाचा प्रीमियर शो

कोल्हापूर, २७ सप्टेंबर २०२३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी, महात्मा गांधीजींचे सत्य व परखड विचार तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी ‘गांधी मरत नसतो’ या मराठी दीर्घ लघु चित्रपटाचा पहिला प्रीमिअर शो सोमवार दि.२ ऑक्टोंबर, २०२३ रोजी दुपारी १२:०० वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय. नवोदित कलाकारांना घेऊन, चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लबने शंभरहून अधिक कलाकारांचा समावेश असलेल्या या मराठी दीर्घ लघु चित्रपटाचा पहिला प्रीमिअर शो आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये बालकलाकार आदित्य म्हमाने, पृथ्वीराज वायदंडे, कनिष्का खोबरे यांनी दिली.

गांधी मरत नसतो या दीर्घ लघु चित्रपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून निर्मिती निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शक अनिल म्हमाने, महेश्वर तेटांबे, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी, सहनिर्माता सनी गोंधळी, अनिरुद्ध कांबळे, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शक छाया पाटील, अरहंत मिणचेकर यांचे तर संकलन राजवीर जाधव यांनी केले असून डी.ओ.पी. म्हणून अमर पारखे, व्यवस्थापक म्हणून मिलिंद गोंधळी, नामदेव मोरे यांनी काम पाहिले आहे.कथा डॉ. शोभा चाळके यांची तर संवाद अनिल म्हमाने यांचे आहेत.

डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. नंदकुमार गोंधळी, किशोर खोबरे, डॉ. शरद शिंदे, डॉ. निकिता खोबरे, दत्तात्रय गायकवाड, दिपक गोठणेकर, स्वप्निल गोरंबेकर, शंकर पुजारी, वर्षा सामंत, नूतन गोंधळी, आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, कनिष्का खोबरे, तक्ष उराडे, स्वरा सामंत, मंथन जगताप, अन्वय म्हमाने, स्वरल नामे, पृथ्वीराज वायदंडे, साईराज निकम, पृथ्वीराज बाबर, सई शेवाळे, भक्ती व भूमी भस्मे, शब्बीर काझी, दिग्विजय कांबळे, रोहीत चांदणे, मारुती गायकवाड यांच्यासह शंभरहून अधिक कलाकारांनी यामध्ये अभिनय साकारला आहे.

या प्रीमिअर शोला प्रमुख पाहुणे म्हणून पार्थ पोळके, प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, मा. आ. राजीव आवळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, प्रा. किसनराव कुराडे, प्रा. टी. के. सरगर, भरत लाटकर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेला अनिल म्हमाने, डॉ. स्मिता गिरी, ॲड. करुणा विमल, सनी गोंधळी, नामदेव मोरे, अरहंत मिणचेकर, डॉ. निकिता खोबरे, पृथ्वीराज बाबर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा