सलमान खानचा ‘टायगर ३’ ईदला नाही तर या दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई, १८ ऑक्टोबर २०२२ : बॉलीवूड मेगास्टार सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर बहूप्रतीक्षित चित्रपट ‘टायगर ३’ ची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. ‘टायगर ३’, २०२३ च्या एप्रिलमध्ये रिलीज केला जाणार होता, पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता टायगर ३ सिनेमा हा पुढील वर्षी दिवाळीला रिलीज केला जाणार आहे.

सलमान खानने टायगर ३ चा लूक सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटची घोषणा केलीय, पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर टायगर ३ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

टायगर ३ हा ब्लॉकबस्टर टायगर सिरीजचा चा तिसरा भाग आहे. हा २०२३ मधला सर्वात मोठा बॉलीवूड चित्रपट असणार आहे, टायगर फ्रेंचाईजी मधील पहिला चित्रपट एक था टायगर, दुसरा टायगर जिंदा है, आणि तिसरा टायगर ३, असेल यापूर्वी या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली होती. त्यामुळेच या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबत चाहत्यांची क्रेझ सातव्या आसमानावर आहे.

या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त इमरान हाशमी, दानिश हुसेन आणि कुमुद मिश्रा सारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट एकच वेळी हिंदीसह, तामिळ ,तेलगू या भाषेत रिलीज होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा