मुंबई, २८ सप्टेंबर २०२२ : टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो ठरलेल्या बिग बॉसचा १६ वा सीजन एक ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नेहमीप्रमाणेच यंदाही ‘मेगास्टार सलमान खान’ हा शो होस्ट करणार आहे. या पर्वासाठी सलमान खानने किती मानधन घेतलं याबद्दल विविध अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान अशातच बिग बॉसच्या नवीन पर्वाच्या लॉन्चवेळी सलमानने स्वतःच त्याच्या मानधनाबद्दल खुलासा केला आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार सलमान खानने शो मेकर्सकडे त्याची फी ३ पट वाढवण्याची मागणी केल्याचा दावा केला होता. सलमान खानने सीजन १५ साठी ४०० कोटी रुपये घेतल्याची चर्चा होती. त्यानुसार हिशोब करायचं झालं तर सीजन १६ साठी सलमान खान १००० कोटीहून अधिकची मागणी करत असल्याचे चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावर सुरू होती.
मुंबईमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये सलमान खानला बिग बॉस साठी मिळणाऱ्या मानधनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नाला सलमानने उत्तर दि,लं तो म्हणाला ‘एवढे पैसे मला कधीच मिळणार नाहीत. मला जर एवढे पैसे मिळाले तर मी आयुष्यभर काम करणार नाही. माझ्याकडे वकिल आणि इतर खर्च खूप आहे. अशा अफवांची इन्कम टॅक्स विभागाचे लोक याची दखल घेतात आणि मला भेटायला येतात’ असं सलमान म्हटला.
१ ऑक्टोबर ला बिग बॉस सीजन १६ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोमध्ये छोटे पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुमबुळ तोकिर, मुन्ववर फारुकी , अब्दू रोझिक, हे कलाकार शोमध्ये सहभागी होतील अशा चर्चा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव